Health | ‘जीवदया’ की ‘जनघात’? ‘कबुतरखाना बंदी’चा विरोध का सायंटिफिक पातळीवर चुकीचा आहे? – सचिन संघवी

समाजसंवाद | ०७ ऑगस्ट | सचिन संघवी

(Health) मुंबईत काही जैन मंडळी कबुतरखाना बंद न करण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांचा दावा आहे की ते ‘जीवदया’ करत आहेत. पण खरी विचार करायला हवी ती गोष्ट ही आहे, ही जीवदया आहे की समाजद्रोह?

 

(Health) वैज्ञानिक सत्य काय सांगते? कबुतरांची विष्ठा म्हणजे रोगांची प्रयोगशाळा. हे काही सामान्य माणसाचं मत नाही, तर वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालेला निष्कर्ष आहे. १) क्रिप्टोकोक्कोसिस (Cryptococcosis)– कबुतरांच्या विष्ठेमधून पसरणारा बुरशीजन्य रोग. मेंदू व फुफ्फुसांवर थेट परिणाम. २) हिस्टोप्लास्मोसिस (Histoplasmosis) – डोळे, फुफ्फुसे, आणि इम्युन सिस्टिमवर घातक परिणाम. ३) सायकोसिस / ओरनिथोसिस (Psittacosis) – कबुतरांच्या लाळेतील बॅक्टेरियामुळे होणारा ताप व न्यूमोनिया. ४) Pigeon Breeder’s Lung – फुफ्फुसांची ॲलर्जीक विकृती, जी सतत कबुतरांच्या संपर्कात असणाऱ्यांना होते.

 

(Health) कशावर परिणाम होतो तर लहान मुले, वयोवृद्ध, अ‍ॅस्थमा किंवा इतर श्वसन विकार असलेले लोक, कैंसर किंवा HIV रुग्ण ज्यांची इम्युनिटी आधीच कमी असते. मग प्रश्न असा निर्माण होतो. काही कबुतरांचं ‘जीवन’ वाचवण्यासाठी जर हजारो माणसांच्या आरोग्याला धोका पोहचत असेल, तर ती खरंच “जीवदया” आहे का? की हा एक धर्माच्या नावाखाली चालणारा अंधश्रद्धेचा पायंडा आहे?
कोणत्या जीवदयेच्या नावाखाली तर गच्च्या गलिच्छ होतात. लोकांना श्वसनरोग होतात. हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये भरती व्हावं लागतं आणि शुद्ध हवा देखील दूषित होते.
ही जीवदया नाही…हा जनधोका आहे! म्हणून आम्ही मागणी करतो : १) मुंबईतील सर्व कबुतरखान्यांना त्वरित बंद करा. २) श्वसन विकारांची वैद्यकीय तपासणी जिथे कबुतरखाने आहेत तिथल्या लोकांवर करा. ३) धर्माच्या नावाखाली कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रोगफैलाव होईल असे प्रकार थांबवा. ४) “जीवदया” ही संकल्पना विज्ञानाच्या विरोधात जाऊ नये यासाठी जनजागृती करा.
जीवदया जर मानवद्रोह करत असेल, तर ती ‘अहिंसा’ नाही, ती ‘असंवेदनशीलता’ आहे. मानवहितापेक्षा धर्म श्रेष्ठ नसतो. मुंबईला कबुतरखान्यांपासून मुक्त करा. मी एक प्रोग्रेसिव्ह विचारांचा जैन आहे म्हणून सांगतो.
FB IMG 1754540995931
Sachin Shantilal Sanghavi
हे ही वाचा : World news | छत्रपती शिवाजी महाराज समजुन घेण्याचा प्रवास म्हणजे ‘खालिद का शिवाजी’ ; निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, संवाद लेखक यांचे म्हणणे समजून घेणे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *