अहमदनगर | १६ जानेवारी | रसिका लायल चावला
(health) रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर, इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटल, गरुड कॅन्सर हॉस्पिटल, एन. सी. डी. सेल सिव्हिल हॉस्पिटल, केअरिंग फ्रेंड्स स्नेहालय, समता फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बूथ हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
(health) शिबीराचे उद्घाटन कॅन्सरतज्ञ डॉ. प्रकाश गरुड यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी डॉ.गरुड यांनी कॅन्सरसारख्या दुर्बल रोगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयी व कॅन्सरसारखे आजार कसे बरे होऊ शकतात, असे सांगितले. सिव्हील हॉस्पिटल येथील एन.सी.डी. सेल समन्वयक डॉ. हर्षल पठारे यांनी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सोईसुविधा मोफत आरोग्य तपासणी, रक्तगट, हिमोग्लोबिन, मधुमेह तपासणी करणे का गरजेचे आहे, या संदर्भात शिबिरार्थींना माहिती दिली.
नेत्रतज्ञ डॉ.अमोल शिंदे, डॉ.शुभम बोज्जा, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. राहुल मगर, त्वचारोग तज्ञ, डॉ. वेदांत लड्डा, स्त्री रोगतज्ञ डॉ. कीर्ती सोलट यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. बूथ हॉस्पिटल प्रशासनाच्या सोशलवर्कर, तसेच रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर व स्नेहालय संचलित बालभवनचे केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल यांनी शहरात, उपनगरात तसेच ग्रामीण भागात जाऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या अनुषंगाने जनजागृती केल्यामुळे आरोग्य तपासणी शिबिरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समता फाउंडेशन व एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांनी शिबिरार्थींची नेत्र तपासणी करताना, शिबिरार्थींची एच.व्ही. देसाई हॉस्पिटल मार्फत मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे माहिती दिली. केअरिंग फ्रेंड्स स्नेहालय तसेच एनसीडी सेल सिव्हिल हॉस्पिटल यांच्या मार्फत ५०० हून अधिक रुग्णांची रक्तगट तपासणी हिमोग्लोबिन तसेच मधुमेह तपासणी केली. डॉ. ज्योत्स्ना भराडीया (मधुमेह तज्ञ), डॉ. अनिल जाधव (एम.डी. मेडीसिन), डॉ. रुपेश सिकची (लहान बालकांचे सर्जन) डॉ. राहुल गाडेकर (हृदयरोग तज्ञ), डॉ. शहनाज आयुब (बालरोग तज्ञ) यांनी शिबीरार्थींची आरोग्य तपासणी केली तसेच रेडिओलॉजिस्ट डॉ. महेश कर्डिले यांनी रुग्णांची मोफत सोनोग्राफी केली. बूथ हॉस्पिटलचे दंत चिकित्सक डॉ. ममता कांबळे, रोटरी क्लबचे डॉ. सचिन साळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अरविंद गीते, सर्जन डॉ. राहुल कांडेकर, त्वचा रोगतज्ञ डॉ. वृषाली महांडुळे, आहारतज्ञ शीतल शिंदे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर. देवदान कळकुंबे, मेजर. ज्योती कळकुंबे, कॅप्टन डेनिसन परमार, कॅप्टन. सुरज वंजारे, ब्रदर. प्रवीण साबळे, ब्रदर.अमित पठारे, बूथ हॉस्पिटलच्या नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य मल्लिका साबळे व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोफत सर्व रोग निदान शिबिरास सहकार्य केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन थाडे, सुभाष गर्जे, दीपक गुजराती, संदीप ठोंबे, वडगाव गुप्ता रोटरी क्लबचे डॉ.अक्षय झिने, सचिव डॉ. महेश यादव, डॉ.संजय गडगे स्नेहालयचे हनीफ शेख, केअरिंग फ्रेंड्स स्नेहालय हॉस्पिटलचे डॉ. देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.