शहर व नगर नियोजन खात्याने मार्च ते ऑक्टोबर २०२४ आठ महिन्यांच्या अवधीत क्षेत्रबदलाच्या अधिसूचना केल्या जारी
पणजी | १३ मार्च | प्रतिनिधी
(Goa news) पेडणे तालुक्यातील मांद्रे, आगरवाडा व मोरजी येथील सुमारे ३ लाख ६९ हजार ४८० चौ.मी. जमिनींच्या क्षेत्रबदलासाठी नगर व शहर नियोजन खात्याने परवानगी दिलेल्या पाच अधिसूचनांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली. प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी सहा आठवड्यांनी ठेवली आहे.
Contents
(Goa news) पेडणे तालुक्यातील मयूर शेटगावकर (मोरजी), सीताराम राऊत (आगरवाडा), झेफेरिनो फर्नांडिस (चोपडे), शुभम सावंत (मांद्रे) यांनी ही जनहित याचिका सादर केली असून राज्य सरकारसह उपवनपाल, ईडन इन्व्हेस्टमेंट्स ॲण्ड इस्टेट्स, ब्रह्म ॲग्रो तेर्रा प्रोजेक्ट्स लि., सेरेस प्रोजेक्ट्स प्रा. लि., के. एच. कमलाद्दिनी, आग्नेलो ओलिव्हेरा, आगरवाडा – चोपडे पंचायत यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
(Goa news) प्रादेशिक आराखडा २०२१ हा कालबाह्य झाला आहे. तरी त्यामध्ये अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या नावाखाली सुधारणा करून बेकायदेशीररित्या क्षेत्रबदल केल्याचा दावा जनहित याचिकेत केला आहे.