पर्वरी | १५ मे | प्रतिनिधी
(Goa news) गोमंतक मराठी अकादमी आयोजित मासिक पुस्तक चर्चा कार्यक्रमात लेखक गुरुदास रेडकर यांच्या ‘क्रांतिसूर्य’ या वैचारिक लेखसंग्रहावर चर्चा होणार आहे. गुरुदास रेडकर यांचे ‘क्रांतीसुर्य’ हे पुस्तक पुणे येथील लोकसंस्कृती प्रकाशन आणि जुन्नर येथील सनय प्रकाशन यांनी प्रकाशित केले.
(Goa news) शनिवारी ता. १७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमी सभागृहात कार्यक्रम होईल. चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शंभू भाऊ बांदेकर हे उपस्थित असतील. क्रांतिसूर्य पुस्तकावर समीक्षक तथा प्रमुख वक्ते मिलिंद माटे आपले विचार मांडतील. विशेष उपस्थिती म्हणून गोमंतक मराठी अकादमीचे सदस्य, पत्रकार प्रभाकर ढगे उपस्थित राहतील.
(Goa news) गोव्यातील सामाजिक समतेची चळवळ आणि दलित समाजातील परिवर्तन या अनुषंगाने लेखकाने या पुस्तकात वैचारिक लेखन केले आहे. या महत्त्वाच्या पुस्तक चर्चा कार्यक्रमास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी केले.
