नवी दिल्ली | रयत समाचार
(Cultural Politics) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर व्यंगचित्र काढल्यामुळे न्यायालयाने इंदोरचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांना माफी मागण्यास भाग पाडले आहे. या घटनेवरून व्यंगचित्र क्षेत्रात संताप व्यक्त होत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप देशभरातील व्यंगचित्रकारांनी केला आहे.
(Cultural Politics) ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी ही माहिती देत, कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. सर्जेराव म्हणाले, खोटा विश्वगुरू साध्या कार्टूनला सुद्धा घाबरतो. व्यंगचित्र हे समाजाचं आरसाप्रमाणे असतं. त्यावर बंदी किंवा दबाव आणणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
(Cultural Politics) या प्रकरणामुळे पत्रकारिता आणि व्यंगचित्र विश्वात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कला, व्यंग आणि टीकेला सहिष्णुतेने घेतले पाहिजे, अन्यथा लोकशाहीच्या मूल्यांवर गदा येईल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे.
हे हि वाचा: Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
