पुणे | १७ सप्टेंबर | रयत समाचार
(Entertenment) स्त्री तमाशा कलावंताच्या उत्तर आयष्यावर भाष्य करणाऱ्या संजोग धोत्रे लिखित आणि दिग्दर्शित ‘कोयना’ लघुपटास महाराष्ट्र राज्य विभागीय पहिले पारितोषिक मिळाले. या लघुपटाची निर्मिती आरंभ क्रिएशन यांनी केली असून दिग्दर्शन व लेखन अहमदनगरचे लेखक संजोग धोत्रे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लघुपट महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून ३५० पेक्षा अधिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातून ‘कोयना’ लघुपटाने विभागीय प्रथम क्रमांक मिळवला.
(Entertenment) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत ‘कोयना’ लघुपटाच्या टीमला सन्मान चिन्ह, मानपत्र व २५,०००/- रूपये रोख असे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
(Entertenment) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले, अभिनेत्री देविका दफ्तरदार, अभिनेते मिलिंद दास्ताने, सुनील गोडबोले, प्रभाकर मोरे, असित रेडीज, राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, बाबा धुमाळ, संयोजक बाबासाहेब पाटील, नितीन धवणे पाटील, आदित्य संजयराव, अपेक्षा चव्हाण आदी उपस्थित होते. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

