मुंबई | १५.१२ | गुरुदत्त वाकदेकर
(Election) राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज केली.
(Election) निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छानणी होईल. त्यानंतर २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून, ३ जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
(Election) १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील.
महापालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. काही उमेदवारांनी मतदारांच्या थेट दारात डस्टबीण पोहोच केले असून अनेकांनी पैठण्याचा खेळ आधीच केल्याचे कळते. आचारसंहिता लागू झाल्याने सरकारी यंत्रणांवर निवडणूक आयोगाचे निर्बंध तत्काळ लागू झाले आहेत.
