Election: नि:पक्षपातीपणे लोकशाहीला चालना देण्यासाठी मतदान करणे गरजेचे – संजय साळवे; मतदार प्रबोधन अभियान कार्यक्रम संपन्न

68 / 100 SEO Score

श्रीरामपूर | ८ नोव्हेंबर | प्रतिनिधी

   Election विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून शंभर टक्के मतदान करावे. त्याचबरोबर आपला हक्क आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना नि:पक्षपातीपणे लोकशाहीला चालना देण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण विभाग दिव्यांग व्यवस्थापन नोडल अधिकारी संजय साळवे यांनी मतदार प्रबोधन अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

अपंग सामाजिक विकास संस्था, आसान दिव्यांग संघटना, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग दिव्यांग कक्ष आणि Election  विभाग प्रांत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तनगर येथील येशू प्रेसिया कारुण्य भवन वृद्धाश्रम या ठिकाणी मतदार जनजागृती अभियान आणि फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, Election  शाखा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी अनुप खरात, आसान दिव्यांग संघटनेचे राज्य समन्वयक चंद्रकांत त्रिभुवन, दत्त नगर शाखा उपाध्यक्ष महेंद्र दिवे, डि पाॅल पब्लिक स्कूलचे जनसंपर्क अधिकारी अशोक पवार, स्कॅश गोल्ड मेडल्स प्राप्त सहर्षा साळवे, पारनेरचे कार्यकर्ते सुनिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृध्दाश्रम संचालिका सि.ग्लोरिया होत्या. याप्रसंगी डि. पाॅल पब्लिक स्कूल सी.बी.एस.सी.ची विद्यार्थीनी सहर्षा साळवे हिने उपस्थित नागरिकांना राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदार शपथ घेतली. संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांकरिता असणाऱ्या सोयी सुविधा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पास्टर चंद्रकांत त्रिभुवन यांनी ईशस्तवन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहर्षा साळवे हिने तर आभार महेंद्र दिवे यांनी मानले.

हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *