अहमदनगर | प्रतिनिधी
(education) अहिल्यानगर महानगरपालिका शाळा क्रमांक ४, रेल्वे स्टेशन येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात पार पडले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
(education)कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प व शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून अभ्यासासोबतच खेळाकडेही लक्ष द्यावे,” असे आवाहन त्यांनी मनोगतातून केले.
कार्यक्रमात अहिल्यानगर मनपा आरोग्य विभाग व जिजामाता आरोग्य केंद्र यांच्या वतीने ‘अतिसारावर करूया मात, स्वच्छ ओआरएसची घेऊन साथ’ या उपक्रमांतर्गत आरोग्य जनजागृती करण्यात आली.
आरोग्य अधिकारी डॉ. आयेशा शेख यांनी अतिसार प्रतिबंधक उपाय, ओआरएस बनवण्याचे प्रात्यक्षिक, हात धुण्याचे योग्य तंत्र, डेंग्यूच्या अळ्या व गप्पी मासे यांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण केली.
(education) सकाळ एनआयई समूहाचे वितरण प्रमुख देविदास आंधळे व समन्वयक शिल्पा धोपावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व एनआयई अंकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिल्पा धोपावकर यांनी एनआयई अंकाचे शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमास शिक्षण प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप बागल, साथरोग अधिकारी सृष्टी बनसोडे, आरोग्य अधिकारी डॉ. आयेशा शेख, स्टाफ नर्स, परिचारिका, आशा व अंगणवाडी सेविका तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मुख्याध्यापक विजय घिगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन मनिषा शिंदे यांनी केले.
भारती कवडे, मनीषा गिरमकर, वर्षा गायकवाड, विठ्ठल आठरे, मेघना गावडे, दीपाली नवले, शबनम खान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता