अहमदनगर | २१ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Education) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शहरातील रेल्वे स्टेशन भागातूल महानगरपालिका शाळा क्रमांक ४ येथे पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील पाककृतींचे परीक्षण सकाळ एनआयइ अंकाच्या समन्वयक शिल्पा धोपावकर यांनी केले.
(Education) सुरुवातीला त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राहावे, यासाठी पालकांनी कोणते पदार्थ दिले पाहिजे, याची सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी जंकफूड खाऊ नये. त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, असे प्रतिपादन केले.
(Education) स्पर्धेसाठी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. स्पर्धेसाठी असणाऱ्या निकषाप्रमाणे फोर्टीफाईड तांदूळ, तृणधान्ये, कडधान्ये, विविध पालेभाज्या यांचा वापर करून नाविन्यपूर्ण पदार्थ पालकांनी बनवले. मिश्र डाळींचे थालीपीठ, दाल खिचडी, पराठे अशा प्रकारे विविध पौष्टिक पदार्थ बनवले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय घिगे, मनिषा गिरमकर, मेघना गावडे तसेच सीएसआरडी विद्यालयाचे विद्यार्थी वैभव सुपेकर, श्रद्धा चव्हाण, नैना पी यांनी मोलाचे योगदान दिले.
हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे पहिले मराठी पुस्तक
