अहमदनगर | २९ एप्रिल | भैरवनाथ वाकळे
(Education) अहिल्याबाई होळकरांच्या नावाने असलेल्या महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी गरीबांच्या शाळा असलेल्या मनपा शाळांकडे अक्षरशः दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गरीबांच्या शाळा असलेल्या मनपा शिक्षकांचे तब्बल २,५२,१२,९७८ रुपये थकविले आहेत. मनपाच्या एकूण १२ शाळा आणि ८५० विद्यार्थी आहेत. याचा दुष्परिणाम थेट गरीबांच्या शिक्षण हक्कावर होत आहे, या गोष्टीचा प्रशासकांनी विसर पडलेला दिसतो. प्रशासकीय काळात शहरात अनेक ठिकाणी लाखो करोडो रूपये विकासकामे नावाचा खर्च होताना दिसत आहे. तो कसा सुरू आहे. टक्केवारीची गणिते काय आहेत हे उघड सत्य शहरातील नागरिकांना माहिती आहे. मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यामागे बसून माणूसकी म्हणून प्रशासक डांगे यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पगार व इतर सोयीयुविधांकडे दूर्लक्ष करू नये.
(Education) अहिल्याबाईंनी अनेक जनहिताची कामे केली. त्यांनी सामान्य रयतेला लेकराप्रमाणे सांभाळले. गरीबांकडे जाणीवपूर्वक त्या लक्ष देत होत्या. त्यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा, वृक्षारोपण आदींसह रयतेची अनेक कामे केली. या आदर्श गोष्टीकडे प्रशासक दूर्लक्ष करत आहेत. अहिल्याबाईंचे नाव दिले, तसा कारभार करावा असे शहर जिल्ह्यातील लोकांना अपेक्षित आहे. पण बाहेरगावाहून आलेले अधिकारी यांना शहराच्या वारशाचा अभिमान नाही, शहरातील गरीब जनतेची स्नेह नाही, असे दिसून येत आहे.
(Education) अहिल्यानगर महानगरपालिकेने नोव्हेंबर महिन्यापासून अनुदान थकविले असून शिक्षकांच्या पगारासाठी ५० टक्के अनुदान न दिल्यामुळे ४३ शिक्षक, ४ शिक्षकेतर कर्मचारी, ११० निवृत्तीवेतनधारक यांचे पगार झालेले नाहीत. त्याचा दुष्परीणाम गरीबांच्या शाळा असलेल्या मनपातील विद्यार्थ्यांवर होत आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहरात १० मराठी माध्यमाच्या व २ ऊर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. खाजगी शाळांशी स्पर्धा करत लोकसहभाग मिळवत मनपा शिक्षकांनी या शाळा टिकवून ठेवल्या आहेत पण प्रशासन वेळोवेळी शिक्षकांच्या दरमहा पगाराकडे दुर्लक्ष करत आहेत.
शिक्षकांचा सातवा वेतन आयोग फरक ७६६१९८४ रुपये, पाच वर्षांपासूनची मेडिकल बीले ५८४५५८ रुपये, शिक्षकांच्या पगारासाठीचे ५० टक्के अनुदान ( महानगरपालिका हिस्सा ) नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ पर्यंतचे १६९६६४३६ रुपये अशी एकूण २,५२,१२,९७८ रुपये महानगरपालिकेने थकवले आहेत.
बहुतांशी शिक्षकांनी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षण बॅंकेचे व राष्ट्रीयीकृत बँकांचे गृहकर्ज घेतलेले आहेत. वेळेवर हप्ता भरला जात नसल्यामुळे शिक्षकांकडून चक्रवाढ व्याज आकारले जात आहे. तसेच वेळेवर कर्जाचा हप्ता जात नसल्यामुळे शिक्षकांचे सिबिल खराब झालेले आहे. त्यामुळे शिक्षकांना कोणाकडूनही कर्ज मिळत नाही. उसनवारी करुन शिक्षकांना कुटुंब चालवावे लागते आहे. बहुतांशी निवृत्तीवेतनधारक शिक्षक/ शिक्षिका वयोवृद्ध आहेत त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतन वेळेवर मिळत नसल्याने औषधोपचारासाठी उसनवारी करावी लागेल. यासर्व कारणांमुळे महापालिका शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. महानगरपालिकेत वेतनासाठी वेळोवेळी चकरा मारुनही काही उपयोग होत नाही. वारंवार वेगवेगळी कारणे पुढे करून वेतन अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०२४-२५ चे शिक्षण विभागाचे बजेट ५ कोटी होते, त्यातील अडीच कोटी रक्कम महानगरपालिकेने अद्याप शिक्षण विभागाला दिलेली नाही.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.