अहमदनगर | २३ जून | प्रतिनिधी
(Education) येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक कर्पे आणि दंतचिकित्सक डॉ. जयश्री कर्पे यांची कन्या दीपश्री कर्पे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या NEET २०२५ राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ५८८ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. तिच्या यशाबद्दल वरद कॉलनी परिवारातर्फे दीपश्री हिचा आणि तिच्या पालकांचा भव्य सत्कार करण्यात आला.
(Education) कार्यक्रमात आदर्श शिक्षक संदीप काटे म्हणाले, जिद्द, मेहनत आणि ध्येयवेड्या इच्छाशक्तीच्या जोरावर दीपश्रीने मिळवलेले हे यश संपूर्ण कॉलनीसाठी प्रेरणादायी आहे. तिने विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
प्रवीण परदेशी यांनी आपल्या मनोगतात दीपश्रीचे कौतुक करताना तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
(Education) सत्काराला उत्तर देताना दीपश्रीने सांगितले, बालपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. आई-वडील, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या पाठींब्यामुळेच मी आज हे पाऊल टाकू शकले आहे. अजून मोठी मजल मारायची आहे.
हीच दीपश्रीसाठी एक उज्वल वैद्यकीय वाटचाल सुरू होण्याची नांदी ठरो, अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केल्या. यशसोहळ्यात किशोर घोडके, बंटी येवलेकर, रुपेश पवार, सुजित चव्हाण, आदेश गुंगे, अंजली परदेशी, जयश्री येवलेकर, यांच्यासह अनेक पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी परीसरातील नागरिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली परदेशी आणि जयश्री येवलेकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन श्रीनिवास एल्लाराम यांनी तर आभार प्रदर्शन किशोर घोडके यांनी केले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
