अहमदनगर | १४ जुलै | प्रतिनिधी
(Education) मे २०२५ मध्ये पार पडलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) फायनल परीक्षेत भुतकरवाडी येथील श्रद्धा आशा अशोक भोसले हिने उल्लेखनीय यश मिळविले आहे. अवघ्या २३ वर्षाच्या वयात श्रद्धाने ही कठीण परीक्षा उत्तीर्ण करत भुतकरवाडी आणि अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्याची मान उंचावली आहे.
(Education) ही परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. श्रद्धाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या यशात तिची आई आशा भोसले व आजी यांचे मोठे योगदान राहिले. श्रद्धा या सामाजिक कार्यकर्ते दिगंबर भोसले यांची पुतणी आहेत.
(Education) श्रद्धा हिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांपासून ते शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपर्यंत सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. तिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
