पुणे | २२ सप्टेंबर | रयत समाचार
पुण्यातील Ph.D. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत पाटीलांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती घेतली असून येत्या मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतले आहे, स्थगित केले. मात्र, कृषी व अकृषी अशा दोन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठामपणे लढा देणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
आता चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून सकारात्मक निर्णय निघून विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.