नगर तालुका | १९ ऑगस्ट | रयत समाचार
(Education) तालुक्यातील पारगाव येथील डॉ.बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थेच्या अंतर्गत सौ.वैशाली कोलते स्वयं रोजगार व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.नितीन कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणतज्ञ डॉ.शरद कोलते, मनीषा पांडे-कोलते, डॉ.नयना कोलते, विदर्भ मित्र मंडळाचे सर्व सदस्य, केडगाव येथील भजनी मंडळ, मिलिंद कोलते, जयश्री रघुराम, आर्किटेक्ट मीनल काळे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Education) यावेळी बोलताना डॉ.कोलते म्हणाले, पारगाव व परिसरात पूर्वी डॉ.हळबे व डॉ.शरद कोलते यांनी जलसंधारण, वृक्षारोपण, रोजगार अशी कामे केली परंतु आज वेगळ्या समस्या आहेत. मागील नऊ वर्षापासून डॉ.शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सुरु आहे. परंतु याठिकाणी असणारी सर्व परिस्थिती पाहता अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कोलते परिवाराकडून संस्थेला चिंचा फोडण्याचे दोन मशीन उपलब्ध करून देण्यात आले. त्यातून या भागात रोजगार उपलब्ध होऊन त्यातील उत्पन्नातून शाळेचा विकास करता येईल. कोलते परिवार नेहमीच शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
(Education) यावेळी प्रास्ताविकात प्रा.शिंदे यांनी सौ.वैशाली कोलते यांनी संस्थेला केलेल्या सहकार्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी, युवक, महिला बचतगट, शेतकरी यांना रोजगार, उद्योग संदर्भातील माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी अवनी फौंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभदा ठिगळे यांनी देखील मनोगत व्यक्त करून रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी निकिता तनपुरे, प्रिती कुमटकर, ईश्वर तनपुरे, सहदेव शिर्के यांनी प्रयत्न केले.
