Education | कॉम्रेड पंकज चव्हाण यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट

धाराशिव | २५.९ | रयत समाचार

‘फुलासारखं हसू, ज्ञानाचा प्रकाश  शिक्षणाने उजळो, मुलांचा सर्व विकास’ या ओळींप्रमाणे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य खुलावे, या हेतूने पारगावचे उपसरपंच कॉम्रेड पंकज चव्हाण यांनी पुढाकार घेतला आणि विद्यार्थांना मिळेल साहित्य.

मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे जानकापूर गावातील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य पाण्याच्या विळख्यात वाहून गेले होते. परिणामी मुलांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आज विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, कंपास, पेन, पाण्याची बाटली आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात गावातील पूरग्रस्त शेतकरी, पत्रकार, तरुण तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम गावकऱ्यांनी कौतुकास्पद ठरविला.

Share This Article