भिंगार | रयत समाचार
(Education) येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर आर्टस् कॉलेज आणि Prosperity Finserv कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १२ वी उत्तीर्ण व नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भव्य नोकरभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
(Education) या मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, Prosperity Finserv कंपनीचे संचालक मुकुल थोरात, कंपनी स्टाफ तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कविता शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Education) विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मेळाव्याला लाभला. प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास दृढ केला. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी कंपनीच्या स्टाफसोबत मोकळ्या मनाने चर्चा करत रोजगाराच्या विविध संधींबाबत माहिती मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुस्तकीम पठाण यांनी केले. सूत्रसंचालन संदीप झावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर मोरे यांनी मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगार व करिअरच्या संधींच्या दृष्टीने एक आगळावेगळा आणि उपयुक्त ठरला.
