पाथर्डी | पंकज गुंदेचा
(education) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुक्यातील कासार पिंपळगावच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात पोवाडा गायन व विद्यार्थ्यांचे भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर पत्रकार अमोल म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून प्रविण काजळे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
(education) विद्यालय परिसरात भगवे झेंडे आणि जयघोषांच्या निनादाने वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित भाषणे सादर करत ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. नववीतील विद्यार्थिनी प्राची बर्डे हिने आपल्या जोशपूर्ण भाषणाने सर्वांना प्रेरित केले. तसेच बर्डे चैतन्य, रोहित तिजोरे, आदित्य कर्डिले, ईशान दगडखैरे, तनिष्का भिसे, अनुजा देशमुख, अनुजा तिजोरे, आराधना राजळे, वैष्णवी बाबर, श्रावणी बर्डे, शिवानी भगत, दगडखैरे प्रगती, युवराज म्हस्के, भार्गवी काजळे, आरोही म्हस्के, मनस्वी लवांडे या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर विचार मांडले.
(education) प्रमुख पाहुणे पत्रकार अमोल म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, खेळ आणि कृतीयुक्त शिक्षणाचा उपयोग करून सर्वांगीण विकास साधावा असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे यांनी शिवरायांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रम घेण्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदिक्षा राजळे आणि मनस्वी लवांडे यांनी केले, तर राजेंद्र वांढेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
हे हि वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.