diwali 2024: दीपावली सणासाठी तात्पुरते फटाके विक्री परवाने घेऊन जावे – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आवाहन; जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असलेले असावी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

अहमदनगर | १२ सप्टेंबर | जि.मा.का.

diwali 2024 येत्या दिवाळी सणासाठी तात्पुरत्या फटाके विक्री परवान्याबाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आवाहन केल आहे. विस्फोटक नियमामधील तरतुदीनुसार येत्या दीपावली सणानिमित्त तात्पुरत्या फटाके परवान्यांसाठी अर्जदारांनी तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करावा. तेथूनच तात्पुरते फटाके विक्री परवाने घेऊन जावे, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.

त्याचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध राहतील. विस्फोटक नियमांनुसार परवाना शुल्क रुपये ५०० आणि अर्ज छाननी शुल्क रुपये ३०० असे एकूण ८०० रुपये स्टेट बँकेत चलनाने भरून त्याची प्रत मूळ अर्जासोबत जोडावी. स्टॉल ज्या हद्दीत असेल तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेची शिफारस सोबत जोडावी. नियोजित जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असलेले असावी, नसल्यास सक्षम अधिकाऱ्यांची तात्पुरती बिनशेती परवानगी घेऊन सादर करावी.

ते पुढे म्हणाले, फटाका स्टॉलकरिता उभारण्यात येणारा तंबू ज्वलनशील पदार्थापासून बनविलेला नसावा आणि तो बंदीस्त असावा. बेकायदेशीर व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही अशी तंबूची रचना असावी. दोन स्टॉलमध्ये किमान तीन मीटर अंतर असावे, तसेच स्टॉल संरक्षित कार्यस्थळापासून ५० मीटर लांब असावा. स्टॉल समोरासमोर असू नयेत. स्टॉलमध्ये गॅसबत्ती, उघड्या अवस्थेतील दिवे वापरू नये. विद्युत जोडणी लाकडी बोर्डाद्वारे स्टॉलनिहाय असावी. विद्युत जोडणी पक्क्या स्वरुपात असावी. प्रत्येक रांगेकरीता स्वतंत्र मास्टर स्विच बसविण्यात यावे.

फटाका स्टॉलपासून कोणालाही ५० मीटरच्या आत फटाके उडविता येणार नाहीत. एका दुकान समूहामध्ये ५० पेक्षा जास्त दुकाने ठेवू नयेत. शोभेची दारू स्टॉलच्या खिडकीमध्ये प्रदर्शनास ठेवू नये. विक्रीसाठी ठेवण्यात आलेली शोभेची दारू आग प्रतिरोधक पात्रामध्ये ठेवण्यात यावी किंवा मूळ बाह्य आवरणासह विक्रीसाठी ठेवण्यात यावी. ज्वलनशील पदार्थ रहदारीच्या जागेपासून योग्य अंतरावर ठेवावे. शोभेची दारू मूळ आवरणातून विक्रीसाठी उघडतांना ती तात्काळ स्वच्छ धुळरहीत जागेत तसेच आग प्रतिरोधक पात्रामध्ये ठेवण्यात यावी.

फटाके साठवण्यासाठी आणि विक्रीसाठी परवाना असलेले दुकान हे ज्वलनशील, विस्फोटक अथवा धोकादायक वस्तू साठवणूकीच्या परिसरापासून किमान पंधरा मीटर अंतरावर असावे. फटाके दुकान निवासी अथवा तळघरात असणार नाही. फटाका विक्री दुकान भरवस्तीत असू नये, उपलब्ध खुल्या जागेत फटाका दुकान असावे. ता. ७ ऑक्टोबरपूर्वी तालुक्याच्या तहसील कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading