अहमदनगर | २६ जून | प्रतिनिधी
(Dirty Politics) सांगलीचे ‘सुपारीबाज’ आमदार पडळकर यांनी केलेल्या चिथावणीखोर आणि हिंसक वक्तव्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर करत केलेल्या विधानामुळे धार्मिक सलोखा धोक्यात आला असून ख्रिश्चन समाजात तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
(Dirty Politics) या पार्श्वभूमीवर सकाळी बिशप हाऊस, तारकपूर येथे विविध चर्चचे धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, आणि ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना कारवाईबाबत मागणीपत्र दिले. यामध्ये पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच संविधानाचा अवमान केल्याने त्यांच्या आमदारकी रद्दची कारवाई व्हावी, अशी मागणी झाली.
(Dirty Politics) बैठकीची सुरुवात रेव्ह. सतीश तोरणे यांच्या प्रार्थनेने झाली. ‘सैनिकांनो धैर्य धरा’ या गीताच्या गायनानंतर रेव्ह. विकास लोखंडे, रेव्ह. सनी मिसाळ यांनी प्रार्थना केली, तर बायबल वाचन रेव्ह. मिसाळ यांनी केले. प्रास्ताविकात रेव्ह. जे.आर. वाघमारे यांनी शांततेने आणि शिस्तीने आंदोलन करण्याचे आवाहन केले. निवेदनाचे वाचन रेव्ह. मार्टिन पारधे यांनी केले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करावा. भारतीय दंड संहिता व तत्सम कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल आमदारकी रद्द करावी
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रेव्ह. वाघमारे, रेव्ह. तोरणे, रेव्ह. मिसाळ, रेव्ह. पारधे, पास्टर जोसेफ वैरागर, सामाजिक कार्यकर्ते पप्पू बारसे, पत्रकार सोलोमन गायकवाड, प्रा. सॅम्युएल वाघमारे आदींसह अनेक चर्चमधील धर्मगुरू, महिलावर्ग आणि युवक सहभागी होते.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल, असे मौखिक व लेखी आश्वासन दिले. ही बाब राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप प्रभूच्या प्रार्थनेने झाला. रेव्ह. जे.आर. वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानत शांततेतून पण निर्धाराने लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

