असा माझा शिवबा
काय सांगू माझ्या शिवबाची कीर्ती,
ज्याला सलाम करते धर्ती
स्वराज्याचे बांधून तोरणं,
फेडले डोळ्यांचे पारणं
कपाळी शोभे चंद्रकोर,
असा माझा सरदार
हाती तलवार धारदार
काय वर्णू शिवबाची बात,
अमावस्याही देत होती साथ
घेऊन मावळे सोबत,
आखूनी ठेवले बेत
नका तुडवू शेतकऱ्याचे शेत,
गड किल्ले जिंकले रातोरात
केली शत्रूवर मोठी मात
असा होता माझा छत्रपती,
काय सांगू त्याची रणनीती
भल्याभल्यांना वाटे भीती
होऊन गेला असा माझा राजा,
धन्य धन्य झाली ही प्रजा
कर्तृत्व पताका गगनी ध्वजा
असा होता माझा राजा,
असा होता माझा राजा
– प्रा. ललिता सरोदे – केदारे
