अहमदनगर | २६.११| रयत समाचार
(Culture) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सकल भारतीय समाज, मानव अधिकार अभियान आणि दैनिक रयत समाचार यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध लेखक डॉ. राही मासूम रज़ा यांच्या लोकप्रिय ‘टोपी शुक्ला’ कादंबरीवर आधारित ‘टोपी की दास्तान’ या दास्तानगोईचे विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.
(Culture) विंग्ज कल्चरल सोसायटी, नवी दिल्ली यांनी प्रस्तुत केलेल्या या कलाकृतीचे दिग्दर्शन प्रख्यात दास्तानकार तारिक हमीद यांनी केले असून कलाकार म्हणून तारिक हमीद, सौरभ प्रताप सिंह आणि रोचना विद्या हे रंगभूमीवर आपली भूमिका साकारतील.
(Culture) स्वातंत्र्यपूर्व काळात एका सांस्कृतिक वातावरणात वाढलेले टोपी आणि इफ़्फ़न या दोन मित्रांची फाळणीनंतर बदललेली आयुष्यरेषा या दास्तानगोईत प्रभावी संवादांद्वारे मांडली आहे. दोन समुदायांमध्ये निर्माण झालेली भीती, गोंधळ आणि शांततेची आस यांचे वास्तववादी चित्रण यातून समोर येते. जातीय-धार्मिक द्वेषाच्या वातावरणात सामाजिक सलोखा आणि मानवी ऐक्याचा मजबूत संदेश देणारी ही कलाकृती विशेष महत्त्वाची ठरत आहे.
कार्यक्रम २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता सीएसआरडी सभागृह, अहमदनगर कॉलेज समोर, स्टेशन रोड, अहिल्यानगर-०१ येथे होणार असून सर्व संविधानप्रेमी आणि नाट्यप्रेमी नागरिकांसाठी प्रवेश खुला आहे.
संगीत संयोजन समीर चव्हाण यांनी केले असून संपूर्ण प्रस्तुतीचा कालावधी १ तास ३० मिनिटांचा आहे. अधिक माहितीसाठी 9405401800, 8237490015, 7709985555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
