Culture: गजराज मित्र मंडळाच्या गणपतीबप्पाचे उत्साहात विसर्जन

69 / 100 SEO Score

जामखेड | १८ सप्टेंबर | रिजवान शेख

Culture तालुक्यातील जवळा येथील गजराज मित्र मंडळाच्या गणपतीबप्पाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी परंपरेप्रमाणे विसर्जन करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात सोमवारी ता.१६ रोजी दहा दिवसांनी बाप्पाला निरोप दिला. परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली.

 

दरवर्षी प्रमाणे गजराज मित्र मंडळ गणरायाचे आगमनापासून ते विसर्जनापर्यंत विद्युत रोषणाईसह विविध सामाजिक उपक्रम, मनोरंजन, स्नेहभोजन कार्यक्रम राबविले जातात. मंडळाचे सर्वच सदस्य यामध्ये हिरीरीने सहभागी असतात. गजराज मित्र मंडळ १९८० सालापासून अखंडितपणे गणपतीबप्पाची सेवा करतीत.

 

पोलीस बिट अमलदार लोखंडे साहेब यांच्या हस्ते संध्याकाळी आरती झाल्यानंतर उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात तसेच धूमधडाक्यात जातात. सार्वजनिक मंडळात सत्यणारायण पूजा आणि भंडाराचा आस्वाद भाविक चाखतात. बाप्पाचे विसर्जन करताना मन अतिशय निराश होते, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते.

 

यावेळी ऋषी ढगे, शंकर ढगे, प्रशांत शिंदे, दयानंद कथले, महेश कथले, सौरभ कथले, ओमप्रकाश कथले, अक्षय कळमकर, आदित्य मंडलेचा, सलमान सय्यद, जशीम शेख, फिरोज तांबोळी, अमोल देवमाणे, अक्षय वाळके, प्रशांत ढगे,अमोल होळकर, शुभम खोले, अमित कोरे आदी मंडळाच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *