Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > CulturalPolitics: जीवनातील अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी प्रत्येकाने गुरूंचा आदर करावा – डॉ. श्याम पांगा;डॉ. पाअुलबुधे फार्मसीत गुरुपौर्णिमा साजरी
अहमदनगर

CulturalPolitics: जीवनातील अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी प्रत्येकाने गुरूंचा आदर करावा – डॉ. श्याम पांगा;डॉ. पाअुलबुधे फार्मसीत गुरुपौर्णिमा साजरी

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 25.07.2024 11:43 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
छायाचित्र - विजय मते
SHARE

अहमदनगर | विजय मते

विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम आई-वडील यांचा आदर करावा. ते सर्वात पहिले आपले गुरु. ज्ञानाच्या रूपाने शिक्षक तुमचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात. जीवनात गुरूंना आदर्श मानून त्याचे पालन करा. जीवनातील अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी प्रत्येकाने गुरूंचा आदर करावा. असे प्रतिपादन डॉ. श्याम पांगा यांनी केले.

वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाअुलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पांगा यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्या अनुराधा चव्हाण, डॉ. वेणू कोला, डॉ. प्रसाद घुगरकर, डॉ. विजय तारडे, डॉ. रोशनी सूर्यवंशी, प्रणाली अनमल, स्वाती कडनोर, पल्लवी कदम, शितिका वाघ आदींसह शिक्षक शिक्षका वृंद उपस्थित होते.

डॉ. पांगा पुढे म्हणाले, जीवनात प्रत्येकाला गुरुची गरज असते. गुरु नसेल तर जीवन निरर्थक आहे. गुरु आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. आपल्या उणिवा ओळखून गुरु त्या सोडवून आपले जीवन सुकर करतात. गुरु आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने शिष्यांचे अज्ञान दूर करून त्यांना सत्याकडे घेऊन जातात. जीवनात आपल्याला अलौकिक व्यक्तिमत्व गुरु देत असतात. तेव्हा त्यांचा आदर करावा. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथम डॉ.ना.ज.पाअुलबुधे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिक्षकांविषयी असलेले प्रेम केवळ गुरुपौर्णिमेला व्यक्त न करता आम्ही रोजच त्यांचा आदर करतो. अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी काळे यांनी केले तर ओंकार पानसंबळ यांनी आभार मानले.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

TAGGED:CulturalPoliticsEducationडॉ.ना.ज.पाअुलबुधेविजय मते
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Wanted: …आता बस झाले! किती दिवस तुम्ही बायका, मुलांना, घरच्या कुटुंबाला सोडून बाहेर रहाणार आहात ? बँक बचाव समितीने फरार आरोपींना केले शरण येण्याचे आवाहन !
Next Article Literature:आशिष निनगुरकर लिखित चपराक प्रकाशन निर्मित ‘अग्निदिव्य’ ग्रंथास स्व.राजाराम डाकवे साहित्य पुरस्कार
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरताज्या बातम्यामहानगरपालिका

Social | महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ उभी करून जनतेच्या हक्कांसाठी लढा उभारला- मुदगल; मनपा पतसंस्थेच्या वतीने अभिवादन

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?