(Cultural Politics) जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष तथा विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सहकार्याने बुऱ्हानगर येथील बाणेश्वर काॅलनीतील श्रीराममंदिर प्रांगणात भाविकांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले. त्याचे लोकार्पण रामनवमीच्या दिवशी भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते तर भाजपा नेते तथा कौशल्य विकास समिती सदस्य विनायक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बाणेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.