cultural politics | शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करणार- राजेंद्र निमसे

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी सभा संपन्न

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • State Executive Committee Meeting

अहमदनगर | प्रतिनिधी

(cultural politics) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राज्य कार्यकारिणी सभा प्रथमेश मंगल कार्यालय, टिटवळा (पूर्व), कल्याण येथे संपन्न झाली. या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. राज्य शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे लवकरच राज्यभर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली.

(cultural politics) या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्याध्यक्ष देविदास बसवदे होते. यावेळी राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य सल्लागार सुरेश भावसार, विश्वनाथ सूर्यवंशी, किरण पाटील, दीपक भुजबळ, संतोष कदम, प्रमोद पाटील, विजय मन्वर, माया चाफले, महादेव देसाई, भगवान पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(cultural politics) संघाने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: संचमान्यता रद्द करण्यासाठी जिल्हानिहाय न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणे, बीएलओची कामे ऐच्छिक करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे, समान कामासाठी समान वेतन, रिक्त पदांची भरती, पदवीधर शिक्षकांना अतिरिक्त न ठरवणे, वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करणे, पोषण आहाराच्या देयकांना मंजुरी, रखडलेली परीक्षा घेणे, १०-२०-३० पदोन्नती योजना, NET/SET/Ph.D. धारकांना प्रशासकीय सेवेत समावेश आणि कॅशलेस मेडिक्लेम योजना तात्काळ लागू करणे. या मागण्यांसाठी शासनाला लवकरच ठोस निवेदन दिले जाणार आहे.
या निर्णयांचे स्वागत राज्य संघटक बाळासाहेब कदम, जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर, प्रदीप चक्रनारायण, सुनील शिंदे, विलास लवांडे, सुधीर बोऱ्हाडे, सुरेश नवले, सुधीर रणदिवे, दत्तात्रय परहर, रामप्रसाद आव्हाड, शिवाजी ढाकणे, संदीप भालेराव, अनिता उदबत्ते, पांडुरंग देवकर, भारत शिरसाठ आदींनी केला.

हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *