मुंबई | १८ जून | प्रतिनिधी
(Cultural Politics) “या शासनाने दिलेलं एकतरी आश्वासन पाळलं आहे का?” असा थेट आणि परखड सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित करत दुतोंडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.
(Cultural Politics) शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी “हिंदीची सक्ती केली जाणार नाही” अशी जाहीर घोषणा केलेली असतानाही शिक्षण विभागाने तसाच शासन निर्णय काढल्याने वाद निर्माण झाला आहे. नवीन निर्णयानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, त्यात हिंदीचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे.
(Cultural Politics) कुंभार यांनी सवाल केला आहे, “एका वर्गात २० पेक्षा अधिक विद्यार्थी हिंदीऐवजी दुसऱ्या भारतीय भाषेची मागणी केल्यासच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार, म्हणजे हिंदीचा पर्याय ही केवळ दिखावा आहे. ही सक्ती नव्हे तर काय?”