मुंबई | प्रतिनिधी
(cultural politics) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे औपचारिक निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ येथे सदिच्छा भेट घेऊन हे निमंत्रण सुपूर्त केले.

(cultural politics) या वेळी मुख्यमंत्र्यांचा विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, चिपळ्या, उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. पारंपरिक भक्तिभाव आणि वारकरी संस्कृतीचा सुगंध दरवळणाऱ्या या भेटीने श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते.
(cultural politics) शिष्टमंडळात मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदींचा समावेश होता.

दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडणारी आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही एक महत्त्वाची परंपरा असून, यामार्फत राज्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडते. यंदा देखील मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून श्री विठ्ठलाचे पूजन करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
