अहमदनगर | १० मे | प्रतिनिधी
(cultural politics) भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, सीमेलगत युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. नुकत्याच या संघर्षात शहीद झालेल्या स्व. मुरली नाईक आणि स्व. सचिन वनंजे या वीर जवानांना अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
(cultural politics) याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, सचिव डॉ. दिलीप पवार, खजिनदार डॉ. विलास सोनवणे, डॉ. समीर होळकर, डॉ. भूषण चंगेडे तसेच सर्व संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(cultural politics) कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “देशाच्या सीमांवर आपले जवान प्राण पणाला लावून लढत आहेत. त्यांच्या सोबत आपण सर्वजण आहोत. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी व कर्तव्य बजावून सुखरूप परत यावेत, हीच सदिच्छा आहे.”
भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचे बलिदान हे देशासाठी अत्यंत गौरवाचे असून ते सदैव स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुनील पवार, डॉ. दिलीप पवार, डॉ. गौरव सोनवणे, डॉ. राजेंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
हे हि वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.