अहमदनगर | १८ सप्टेंबर | विजय मते
Cultural Politics सावेडी उपनगरातील वसंतटेकडी येथील डॉ.ना.ज.पाअुलबुधे शैक्षणिक संकुलाची गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाली. शहरातील नामांकित ‘ढोल-ताशा’ पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. त्याचबरोबर संस्थेच्या विविध शाळेच्या विद्यार्थांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी रामभाऊ बुचकुल, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे, रघुनाथ कारमपुरी, साई पाअुलबुधे, डॉ.श्रद्धा पाअुलबुधे, शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख डॉ. रेखाराणी खुराना महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.श्याम पंगा, डॉ.सुचित्रा डावरे, संदिप कांबळे, अनुराधा चव्हाण, सविता सानप, भरत बिडवे, अनिता सिद्द्म, विनायक मच्चा, शिक्षेकतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावर्षी गणेशेत्सवात शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, भक्ती-गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. विसर्जन मिरवणूकीला सकाळी विधिवत पूजा करून शैक्षणिक संकुलातून मिरवणुकीला सुरवात झाली. श्रीराम चौक ते यशोदानगर गणेश विसर्जन घाट हा विसर्जन मार्ग होता. आताच्या काळातील मोठ्या आवाजाच्या मिरवणुकीतील आवाजाला फाटा देऊन, पारंपारिक पद्धतीने मिरवणूक संपन्न झालेली विसर्जन मिरवणूक, हे या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्ये होते. मिरवणुकीच्या प्रारंभी प्राथमिक शाळेचे लेझीम पथक, त्यानंतर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे पारंपारिक वेशातील लेझीम पथक व त्यानंतर ढोल-ताशा पथक व शेवटी सजावट केलेला गणपती विसर्जनाचा रथ अशी जवळ जवळ ४०० मिटर लांब विसर्जन मिरवणूकची शोभायात्रा निघून ती गणेश विसर्जन घाटापर्यंत पोहचली.
फुगडी, लेझीम या खेळांची प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान सादर केले.
यावेळी विविध सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा विद्यार्थांनी दिल्या. उत्सवाच्या दरम्यान दररोज विधिवत पूजा होऊन सकाळ व संध्याकाळी संस्थेच्या पदाधिकारी व विद्यार्थाच्या उपस्थित महाआरती उत्साहात संपन्न झाल्या. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर” जयघोषाने व जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला. नागरिकांनी मिरवणुकीचे कौतुक केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.