Cultural politics | नगरमधे केरळचीच अनुभूती– ब्रिगेडियर पी. सुनील कुमार; सम्राट बळीराजाच्या स्मरणार्थ ओणम साजरा

अहमदनगर | १४ सप्टेंबर | प्रतिनिधी

(Cultural politics) नगरातील केरला समाजम तर्फे वृंदावन लॉन्स येथे भव्य ओणम उत्सवाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून या उत्सवाचे उद्घाटन ब्रिगेडियर पी. सुनील कुमार (एसएम, कमांडंट, एमआयसी अँड एस) यांच्या हस्ते झाले. यावेळी लेफ्टनंट कर्नल अलेक्स डॅनियल, मेजर अभय शेणाय, मेजर निधी एम.एन., सब मेजर राजेश ए.व्ही., तसेच केरला समाजमचे बाबु टायरवाले, व्ही.पी. सुदर्शन, पी. सत्यन, वसंतसिंग, राजू लक्ष्मण, स्मिता बिजू, पी.सी. श्रीधर, कार्तिक नायर, सुरेश कुमार, सीएसआरडीचे डॉ.जेमोन वर्गीस, बाळासाहेब बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.Cultural politics

(Cultural politics) उद्घाटनप्रसंगी बोलताना ब्रिगेडियर सुनील कुमार म्हणाले, मी एमआयआरसी येथे कार्यरत असल्याने बाहेर संपर्क कमी येतो, पण आज येथे आलेल्या वातावरणामुळे मला केरळमध्ये असल्याचा अनुभव आला. जिल्ह्यातील समाज बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहेत, हे पाहून आनंद झाला.

(Cultural politics) केरळमधील लोक जगभर उद्योग-व्यवसायासाठी स्थायिक झाले असून धर्मभेद न मानता ओणम हा सण एकत्र येऊन साजरा करतात, असेही त्यांनी नमूद केले. नगरमध्ये स्थायिक झालेली दक्षिण भारतीय मंडळी स्थानिक संस्कृतीत एकरूप झाली असून मराठी भाषा बोलण्यातही पारंगत आहेत. नगरच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी गौरविले.

दिवाळीप्रमाणेच महत्त्वाचा मानला जाणारा हा सण वामनावतारातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जनतेवर प्रेम करणारा बळीराजा दरवर्षी दहा दिवसांसाठी पृथ्वीवर येतो, अशी परंपरा असून त्याच्या स्वागतासाठी फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात.

संपूर्ण दिवसभर चाललेल्या उत्सवात चित्रकला स्पर्धा, फुलरांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य-ऑर्केस्ट्रा यांसह विविध उपक्रम राबविण्यात आले. पारंपरिक पद्धतीने सतरंजण भोजन केळीच्या पानावर देण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केरला समाजमच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. उत्सवाचे वातावरण केरळच्या सणोत्सवाचीच अनुभूती देणारे ठरले.

Share This Article