मुंबई | गुरूदत्त वाकदेकर
(Cultural Politics) श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा ता. १८ ऑगस्ट रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

(Cultural Politics) या सोहळ्या निमित्त इंग्लंडहून परत आणलेल्या श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीचे दर्शन तसेच बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांची माहिती यांचे अनोखे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
(Cultural Politics) हे प्रदर्शन ता.१९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान सकाळी ११ ते सायं ७ या वेळेत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला दालनात पाहता येणार असून, इतिहासप्रेमी व नागरिकांसाठी ही एक दुर्मिळ ऐतिहासिक मेजवानी ठरणार आहे.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर


