Ipl

Cultural Politics | भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या अनुयायी, भक्तांची कसून चौकशी करावी- कॉ. ॲड. सुभाष लांडे; पुरोगामी महाराष्ट्राच्या नावास बुवाबाजीने फासला काळीमा

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २०.३ | रयत समाचार

नाशिकमधील अशोक खरात नावाच्या लिंगपिसाट भोंदूबाबाविरुद्ध गंभीर आरोप समोर येत असून त्याच्या आणि त्याच्या अनुयायांच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी याबाबत कठोर भूमिका घेत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

कॉ. ॲड. लांडे यांनी केलेल्या मागणीनुसार, अशोक खरात हा सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या आश्रयामुळे बळकट झाला असून त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती गोळा केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्याचे भुखंड असण्याची शक्यता आहे. राज्यातील काही मंत्री, आमदार आणि खासदार त्याच्या संपर्कात असल्याने महिला शोषणाचे त्याचे धाडस वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच, या भोंदूबाबाने भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेक असहाय महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. राजकीय दडपणाने पोलिस प्रशासनावरही त्याचा प्रभाव असल्याची भावना निर्माण झाल्याने पीडितांना न्याय मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -
Ad image

या पार्श्वभूमीवर, अशोक खरात आणि त्याच्या अनुयायांची नि:पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा व प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Share This Article