अहमदनगर | १० जुलै | प्रतिनिधी
(Cultural Politics) पद्मशाली समाजाचा वैशिष्ट्यपूर्ण ‘बागुल पंडुगु’ अर्थात बागेचा सण यंदाही पारंपरिक उत्साहात ११ जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त समाजातील प्रत्येक कुटुंबाने घरटी एक वृक्ष लावावा, असे आवाहन माजी नगरसेविका वीणा बोज्जा यांनी केले आहे.

(Cultural Politics) गेल्या कित्येक वर्षांपासून आषाढ पौर्णिमेनंतर पद्मशाली समाजात मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातो. अहमदनगर शहरातील बालिकाश्रम येथील मंदिर, तोफखाना भागातील मंदिर व सावेडी उपनगरातील श्रमिक नगर येथे हा सण विशेष उत्साहाने साजरा करण्यात येतो.
(Cultural Politics) या दिवशी समाजातील नागरिक देवीची पूजा करून, पर्यावरणाचे रक्षण, संतुलित पर्जन्यवृष्टी, दुष्काळ व अतिवृष्टी टळावी तसेच रोगराई दूर व्हावी यासाठी प्रार्थना करतात. निसर्गाशी नाळ जोडणारा हा सण संपूर्ण महाराष्ट्रभर पद्मशाली समाजात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
यावर्षी पर्यावरण पूरक उपक्रम राबवत प्रत्येक घराने वृक्षारोपण करावे, असे आवाहन बोज्जा यांनी केले असून ज्यांना रोपांची गरज असेल त्यांनी संपर्क साधावा, त्यांच्यासाठी विनामूल्य रोपांची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
