Cultural Politics | महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त जनता उपाशी असता पुण्यात विक्रमी 610 किलोचा लाडू; शहांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा ‘लाड’

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | २४.१० | रयत समाचार

(Cultural Politics) रा.स्व.संघ बीजेपीचे अमित शाह यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक आगळावेगळा विश्वविक्रम प्रस्थापित करून घेतला. रायकर फार्म, बाणेर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करण्यात आला. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील जनता विशेषतः शेतमजूर व ग्रामीण कारागिर अक्षरशः उपाशी असताना हे लाड करणे योग्य आहे का, अशी चर्चा झडू लागली आहे. राज्य सरकारने ३२ हजार कोटी रूपये जाहीर केले असले तरी त्यापैकी ३२ पैसेही शेतमजूर व ग्रामीण कारागीर यांना मिळणार नाहीत. ग्रामीण शेतमजूर बहुतांश विधवा, परित्यक्त्या, भुमीहीन आणि ज्येष्ठ नागरिक महिला आहेत. या मोठ्या संख्येने असलेल्या लाडक्या बहिनींकडे लोकल राजकारणी व अध्यात्मिक राजकारणी दूर्लक्ष करत आहेत का? असा सवाल निर्माण होत आहे.Cultural Politics

(Cultural Politics) दरम्यान, या भव्य लाडूसाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर आणि १५० किलो तूप वापरण्यात आले. वाढदिवसाच्या मुहूर्तावर तयार केलेला हा विशाल लाडू Winners Book of World Records मध्ये नोंदविलासुध्दा आहे.

(Cultural Politics) यावेळी अभिनेत्री व मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी नोंदविलेल्या विश्वविक्रमाची घोषणा केली. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र १८४ विश्वविक्रम करून घेणारे पहिले भारतीय बी.के. डॉ. दीपक हरके, ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. त्रिवेणी, तसेच समृद्धी केटरर्सचे संचालक जालिंदर वाळके पाटील यांना देण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, अमित शहांच्या सेवाभावी आणि संघटनशील कार्यप्रेरणेप्रमाणेच हा उपक्रम लोकांमध्ये सकारात्मकता आणि ऐक्याचा संदेश देणारा आहे. संपूर्ण पुण्यात या विक्रमी लाडूच्या चर्चेला उधाण आले असून, अनेकांनी या अनोख्या वाढदिवसाच्या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article