अहमदनगर | प्रतिनिधी
शिक्षकेतर कर्मचारी नेते संतोष कानडे यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या पुस्तकभेट उपक्रम वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे MLA संग्राम जगताप यांनी केले.
आमदार जगताप व शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या वतीने कानडे राबवित असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील योगदानबद्दल आणि नुकतेच कानडे यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी आ. जगताप बोलत होते. यावेळी विनोदी लेखक साहित्यिक संजय कळमकर, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, डॉ. किशोर धनवटे, सुभाष सोनवणे, ज्ञानदेव पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध शाळा महाविद्यालयात व सार्वजनिक वाचनालय, शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी मोफत पुस्तकभेट उपक्रम राबविला आहे. शालेय वयातच ग्रंथालयाशी मैत्री व्हावी प्रेरणादायी पुस्तक वाचनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, नववाचकांना प्रेरणा मिळावी, पुस्तकांबद्दल जागृकता निर्माण होऊन वाचन चळवळ बळकट व्हावी आणि अवांतर वाचनास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध शाळा महाविद्यालयच्या ग्रंथालये व सार्वजनिक ग्रंथालयांना त्याचबरोबर वाढदिवस, लग्न समारंभात सत्कार प्रसंगी पुस्तके भेट, विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती, संविधान दिन, राष्ट्रीय दिवस निमित्ताने पुस्तकभेट उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संतोष कानडे यांनी दिली.
हे ही वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.