Crime | मुर्दाडांची मर्दुमकी : रस्त्यावरच्या अरेरावीचा डॉ. धामणे यांना आलेला अस्वस्थ करणारा अनुभव

पोलिसदलाची प्रतिमा खराब करणारांवर नविन एसपी सोमनाथ घार्गे वचक ठेवणार का ?

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

खलरक्षणाय, सद्निग्रहणाय ?

अहमदनगर | १७ जून | प्रतिनिधी

(Crime) सामान्य माणूस आपले आयुष्य शांतपणे, कुणालाही न दुखावता जगत असतो. पण काही सरकारी कर्मचारी, विशेषतः पोलीस खात्यातील काही व्यक्ती, आपल्या पदाचा गैरवापर करत सामान्य माणसांवर दडपशाही करून आपली ‘मुर्दुमकी’ दाखवत असतात. असाच एक अनुभव ‘मनगाव’ प्रकल्पाचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे यांना नुकताच आला आणि तो त्यांच्या शब्दांत अस्वस्थ करणारा ठरला.

 

(Crime) डॉ. धामणे हे मनगावहून अहिल्यानगरकडे जात असताना सावेडी नाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका काळ्या काचा असलेल्या काळ्या क्रेटा कारने धडक दिली. ही घटना घडल्यावर त्या कारमधून एक अडदंड व्यक्ती आणि त्याचा सहकारी उतरले आणि अत्यंत उद्धटपणे वागू लागले. शिवीगाळ करत रस्त्यातच धमकावत ते डॉ. धामणे यांना खाली उतरवू लागले.

 

(Crime) डॉ. धामणे यांनी परिस्थिती समजून न घेता आक्रमक होत असलेल्या त्या व्यक्तीच्या वागणुकीवर शंका घेतली. काही वेळाने तो स्वतःला पोलीस असल्याचे सांगू लागला. पुढे चौकशीत समजले की, हा व्यक्ती म्हणजे पो. कॉ. शरद (भाई) अहिरे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आहे.

 

(Crime) ही व्यक्ती पोलीस असल्याचा वापर करून जबरदस्तीने नुकसान भरपाईची मागणी करत होती. शिवाय ‘तुझ्यावर गुन्हा दाखल करतो’ अशी धमकीही दिली गेली. डॉ. धामणे यांनी त्यांची बहीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचा उल्लेख केल्यावरच काहीशी नरमाई दाखवली गेली.
महत्त्वाचे प्रश्न उपस्थित :
या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात : सरकारी पोलीस कर्मचारी रस्त्यावर सामान्य नागरिकांशी अशा अरेरावीने का वागतात?
साध्या DB (गुन्हे शाखा) पोलिसाकडे काळी काच असलेली महागडी गाडी, आयफोन १६ प्रो, रेबन गॉगल यासारख्या वस्तू कुठून येतात?
अशा कर्मचाऱ्यांवर संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी का दुर्लक्ष करतात?
सामान्य माणसाने अशा प्रसंगी संरक्षणासाठी कुणाकडे धाव घ्यायची?

डॉ. धामणे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर असा त्रास सहन करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?

पोलिसांवरील विश्वास डळमळीत : डॉ. धामणे हे गेली अनेक वर्षे रस्त्यावरच्या महिलांसाठी, बेवारस मातांसाठी काम करत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून सध्या ४७७ माता-भगिनी व ४२ मुले मनगावी सुरक्षित राहतात. पण पोलिसांकडून असा अनुभव आल्यावर, समाजातील अशा सेवाभावी कार्यकर्त्यांचीही झोप उडते, ही बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे.
सरकार व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

Crime

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *