Crime | कर्जतकरांचा स्वाभिमान दुखावला ? नव्या एसटी बसवरील ‘कर्जत’ नाव पुसण्याचा खोडसाळ प्रकार!

कर्जत | १८ सप्टेंबर | रयत समाचार

(Crime) पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या कर्जत एसटी डेपोचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नुकतेच कर्जत येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनाने १० सप्टेंबरपर्यंत डेपोला एसटी बस उपलब्ध करून देण्याचे आणि २० सप्टेंबरपर्यंत डेपो कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रत्यक्षात एसटीच्या ‘लालपरी’ कर्जतमध्ये दाखल झाल्या आहेत.

Crime
Photo credit – Dr.Afarozkhan Pathan

(Crime) मात्र, या आनंदातही राजकीय वाईट सावली पडली आहे. नव्याने आलेल्या बसवर असलेले ‘कर्जत’ हे नाव कुणीतरी खोडून टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकारामागे स्थानिक नेत्यांच्या राजकीय पोटदुखीचा डाव आहे का? असा सवाल आमदार रोहित पवार यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

Crime
Photo Credit – Dr. Afarozkhan Pathan

(Crime) कर्जतकरांचा स्वाभिमान आणि सद्गुरु संतश्री गोदड महाराजांच्या पवित्र भूमीचे नाव पुसण्याचे धाडस कोणी केले, याचा शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या मनात संताप असून हा प्रकार ‘कर्जत’ या तालुक्याच्या ओळखीवरच घाला घालणारा असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे.

 

स्थानिक कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, कर्जतकर आपल्या भूमीच्या नावाचा अपमान कधीही सहन करणार नाहीत. या विकृतीमागील हात तात्काळ उघड झाले पाहिजेत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल.

 

कर्जत एसटी डेपो सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारच्या घटनांनी प्रशासनासमोर नवा प्रश्न उभा केला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेत.

 

Share This Article