पाथर्डी | १ जुलै | प्रतिनिधी
(Crime) शहरात पुन्हा एकदा पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत चार लाख ब्यान्नव हजार चारशे वीस रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत एक मावा तयार करण्याचे मशीन, विदेशी दारूचा मोठा साठा व दोन कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय मागील गुन्ह्यातील एक संशयित आरोपीही पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आला.
(Crime) जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष निर्देशानुसार पाथर्डीमध्ये सोमवारी सकाळी सकाळी छापा टाकण्यात आला. या वेळी काल्या उर्फ तोफीक निजाम शेख यांच्या राहत्या घरातून ₹४,९२,४२०/- किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. छाप्याच्या वेळी काल्याच्या नातेवाईक महिलांनी पोलिसांना विरोध करत त्याचा संबंध नाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी “घरात काही आढळले नाही तर आम्ही परत जाऊ, पण सापडले तर कारवाई होणारच” अशा शब्दांत ठाम भूमिका घेतली आणि अखेर महिला नरमल्या.
(Crime) यानंतर काल्याच्या जुन्या घरात एक मावा तयार करण्याचे मशीन सापडले. त्या ठिकाणी उपस्थित असलेले रंगनाथ गायकवाड व इशान हरुण शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अवैध दारू साठा आढळलेल्या ठिकाणाहून काल्या शेख व अल्ताफ रशीद शेख यांनाही अटक करण्यात आली. पुढे ‘रॉयल पान स्टॉल’ येथून दोन धारदार कोयते पोलिसांनी हस्तगत केले.
कारवाईनंतर पोलिस पथक जेव्हा परतत होते, तेव्हा जुन्या मावा प्रकरणातील आरोपी सुनिल शिंदे (राहणार कसबापेठ) यालाही ताब्यात घेण्यात आले.
उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाची पाथर्डीत ही तिसरी मोठी कारवाई आहे. मावा, सुगंधित तंबाखू, अवैध दारू विक्रेते, तसेच संशयास्पद लॉज यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र, या धंद्यांचे मुळापर्यंत उच्चाटन होईल का, की हे केवळ तात्कालिक कारवाईचे ढोंग ठरेल, यावर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.