Crime: आदर्श सरपंच देशमुख खूनाच्या मुख्य आरोपीस फाशीची शिक्षा द्या – सरपंच संघटना; 2 जानेवारीला ‘ग्रामपंचायत काम बंद आंदोलन’

10 / 100 SEO Score

राक्षसाचाही आत्मा थरथर कापावा, इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले

शेवगाव | २६ डिसेंबर | लक्ष्मण मडके

(Crime) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खून आहे. जल्लादांनाही पाझर फुटावा, राक्षसाचाही आत्मा थरथर कापावा, इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले गेले.

(Crime) तक्रारीनुसार आरोपींनी सरपंचाच्या गावच्या एका वॉचमनला मारहाण केली. त्याचा जाब विचारायला गेलेले सरपंच संतोष देशमुखांसोबत आरोपींची मारहाण झाली. त्या एका घटनेवरुन असे काय झाले की, इतक्या क्रृरपणे खून करण्यात आला. या घटनेतील ४ आरोपींना अद्यापपर्यंत पकडले असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. त्या आरोपीस अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास उच्चस्तरीय अधिका‌ऱ्यामार्फत करुन कटातील मुख्य सुत्रधाराचा तपास लावावा. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी.

सरपंच हा गावचा प्रमुख असतो. त्यांना गावाच्या हितासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे असे निर्णय घेत असताना गावगुंडाचा नेहमी त्रास होतो. त्यासाठी ‘सरपंच संरक्षक कायदा’ करण्यात यावा. या मागण्यांकरिता शेवगाव तालुक्यातील सर्व सरपंच यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याकरिता सरपंच संघ शेवगाव यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले.
 यावर लहू भवर, सुनील गरड, सुरज घोरपडे, ज्ञानदेव खरड, माऊली निमसे, सचिन म्हस्के, मंदाकिनी बेडके, वैभव पूरनाळे, आण्णासाहेब रुईकर, विद्या बडधे, काकासाहेब घुले, आदिनाथ कापरे, विकास गटकळ, उषाताई मडके, अंजना वाल्हेकर, महादेव पवार, चांद शेख, विद्या लोढे, सतीश पवार, अयोध्या काटे, अनिता समृत आदींच्या सह्या होत्या. निवेदनाची प्रती मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी जि.प., पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या.

सरपंच संतोष देशमुख यांच्या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी ता.२ जानेवारी २०२५ रोजी एकदिवसीय ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती सरपंच संघटनेने दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *