अहमदनगर | राहुल जाधव
champion रविवारी ता.२१ जुलै रोजी एव्हरेस्ट २०२४ ची नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा द्वारका लॉन येथे पार पडली. शासकीय संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांचा परिपुर्ण बौध्दिक विकास व्हावा ही संस्थेची संकल्पना आहे.
स्पर्धा पाच मिनिटांची होती आणि खूप विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी सर्वाधिक उदाहरणे सोडवण्याचा मान अहमदनगरची कु. आराध्या संदिप साबळे या ७ वर्षीय विद्यार्थीनीने पटकावला. तिने सर्वाधिक म्हणजेच पाच मिनिटांमध्ये १७९ गुण मिळवून २०२४ चे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चे बक्षीस मिळवले. सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
तिला ‘युनिक चाईल्ड अकॅडमीचे पांडुरंग तांबे, अनुजा तांबे यांचे सहकार्य मिळाले. यशाबद्दल कु. आराध्या हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.