Bureaucracy | अहिल्यानगर मनपा प्रशासकाकडून सुटेना ‘व्हिआयपी वॉर्ड’चा ‘घाण पाणी’ प्रश्न; २ जूलै रोजी आयुक्त दालनात ‘ठिय्या आंदोलन’

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

अहमदनगर | २८ जून | प्रतिनिधी

(Bureaucracy) अहिल्यानगर महानगरपालिकेतील व्हिआयपी वॉर्ड असलेल्या सारसनगर भागातील ‘घाण पाण्याचा प्रश्न’ मार्गी न लागल्यास आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आयुक्त तथ प्रशासक यशवंत डांगे यांना दिले.

(Bureaucracy) आपल्या पत्रात भागानगरे म्हणाले, गेल्या १ महिन्यापासून सारसनगर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी ‘घाण पाण्याचा प्रश्न’ भेडसावत असून या घाण पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, पोट दुखणे या सारख्या आजारांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. अनेकवेळाला महानगरपालिका प्रशासनाकडे या घाण पाण्याविषयी तक्रार करुन कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग झाला नसल्यामुळे येत्या ८ दिवसांत सारसनगरचा घाण पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास मा.आ. संग्रामभैय्या अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपमहापौर श्री. गणेशरावजी भोसले साहेब व मा. नगरसेवक संजयजी चोपडा साहेब यांच्या उपस्थितीत बुधवारी ता.२ जूलै रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त दालनात ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात येईल याची दखल महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी.

(Bureaucracy) भागानगरे पुढे म्हणाले, आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहिल याची नोंद घ्यावी.
अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या नागरिकांमधे अनेक प्रकारच्य तक्रारी आहेत. शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शहरात कचर संकलन ठेकेदार असूनही ‘शहराचा उकिरडा’ झाल्याने सर्वत्र मोठेमोठे कचरा ढिग दिसत आहेत. येथील नागरिक तक्रारी करू कंटाळले आहेत. मनपात नगरसेवक नसल्याने प्रशासकीय कारभाराचा सावळा गोंधळ सुरू आहे. नगररचना विभागातील लेआऊट व बांधकाम परवानग्याकडेच लक्ष असल्याने इतर नागरी सुविधांकडे मोठे दूर्लक्ष होत आहे.
दरम्यान, शहरातील इतर वॉर्डातील लोकांची अशी परिस्थिती असताना अहिल्यानगर महानगरपालिकेतील व्हिआयपी वॉर्ड असलेल्या सारसनगरच्या नागरी सुविधांची वाणवा सुरु आहे. येथील बहुतांशी जनता हिंदू असूनही मनपा प्रशासकाकडून हिंदूंचे प्रश्न सोडविल जात नाहीत, हे अन्यायकारक आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकांना ‘घाण पाणी’ प्यावे लागत आहे. येथील माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांना थेट आंदोलन करावे लागत असेल तर ही शहराच्या लोकांची, माजी मनपा पदाधिकारी यांची शोकांतिका आहे.
राज्य शासनाने अकार्यक्षम प्रशासकांनी तातडीने माघारी बोलवून घेतले पाहिजे. अहिल्याबाईंच्या नावाने असलेल्या महानगरपालिकेत दूसरा संवेदनशिल प्रशासक दिला पाहिजे.

 

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *