कोल्हापूर | २८ जुलै | प्रतिनिधी
(Bureaucracy) कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या टक्केवारी घोटाळ्याप्रकरणी प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप करत शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना तात्काळ पदमुक्त करून त्यांच्याऐवजी सक्षम व प्रामाणिक प्रशासक नेमण्याची तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(Bureaucracy) निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२० पासून महापालिकेचे सभागृह निवडणूकांअभावी रिक्त आहे. यामुळे महापालिकेचे प्रशासन प्रशासकाकडे आहे. या दरम्यान अनेक टक्केवारी प्रकरणे समोर आली असून, त्यात प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी कारवाई करण्याऐवजी सौम्य आणि बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
(Bureaucracy) शहरातील महत्त्वाचे प्रकल्प रखडले असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शाहू सेनेने इशारा दिला आहे की, जर ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.