मुंबई | ३ जुलै | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे औपचारिक स्वागत केले आणि अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राजेश कुमार यांचा प्रशासन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व दूरदृष्टी राज्याच्या प्रगतीसाठी निश्चितच लाभदायक ठरेल. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी पद्धतीने कार्य करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेश कुमार यांनी विविध विभागांमधील समन्वय, कार्यक्षम अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख प्रशासन या दृष्टीने पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत.
विखे पाटील यांनी राजेश कुमार यांना त्यांच्या आगामी प्रशासकीय कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, राज्याच्या विकास प्रवासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
