श्रीरामपूर | २९ मार्च | सलीमखान पठाण
(Biodiversity) श्रीरामपूर नगर परिषदेचे १०० दिवशीय ७ कलमी कृती आराखडा या उपक्रमांतर्गत बीजगोळे तयार करणे या उपक्रमासाठी शहरातील बचतगट व नगरपालिका शाळा यांचा समावेश केला. लोकमान्य टिळक वाचनालयात मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
(Biodiversity) माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्रीरामपूर नगरपरिषद १०० दिवसीय ७ कलमी कृती आराखडा माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बीज गोळे (Seed Balls) बनविण्याची कार्यशाळा लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती.
बिजगोळा :
बीजगोळे (सीड बॉल्स) बनवण्याची प्रक्रिया आणि वापर- मिश्रण, माती व कंपोस्ट एकत्र करणे.
पाणी मिश्रण- माती चिकट होईपर्यंत हळू हळू पाणी मिसळले. मातीचे गोळे बनवुन थोडी माती घेऊन त्यात छोटा खड्डा केला. त्यात बियाणे टाकले आणि त्याचा गोळा बनवला.
सीड बॉल सुकवणे- बीज गोळे २४ ते ४८ तासाच्या कालावधीसाठी सूर्यप्रकाश नसणाऱ्या खोलीत सुकवावे.
वापर- ठरवलेल्या ठिकाणी बीज गोळे लावा किंवा पसरवा. ४८ तास अंधाऱ्याखोलीत ठेवून पावसाळ्यात त्याचा वापर करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.