(Biodiversity) तालुक्यातील अंजनापुरमध्ये पंधराशेएक झाडांच्या लागवडीचा ‘निसर्ग वंदन’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात पद्मश्री चैत्राम पवार व पाणी फाउंडेशनचे सल्लागार डॉ. अविनाश पोळ, ॲड. श्याम आसावा आदी उपस्थित होते.
(Biodiversity) गेल्या दहा वर्षांपासून अंजनापुरमध्ये ‘वृक्षवेध फाउंडेशन’च्या माध्यमातून पर्यावरण पूरक कार्य होत असून, आतापर्यंत १६,००० पेक्षा अधिक देशी झाडे लावून ती जगवली गेली आहेत. या उपक्रमात बाबा गव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असे ॲड. श्याम आसावा म्हणाले.
(Biodiversity) “अंजनापुरचे नाव इतिहासात नोंदवले जाईल,” असे गौरवोद्गार डॉ. पोळ यांनी यावेळी काढले.