कोल्हापूर | २३ ऑक्टोबर | प्रतिनिधी
दिल्लीस्थित Bbc मराठीचे संपादक डॉ. अभिजीत कांबळे यांचे ‘माध्यमांची विश्वासार्हता’ या विषयावर अत्यंत महत्त्वाचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात झाले. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवांसह बीबीसीने वार्तांकनासंदर्भात अवलंबलेली धोरणे याविषयी विद्यार्थ्यांना अत्यंत आत्मियतेने मार्गदर्शन केले, अशी माहिती डॉ. आलोक जत्राटकर यांनी दिली.
डॉ. अभिजित कांबळे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले, पराकोटीची स्पर्धा आणि बाह्यशक्तींचा दबाव यातून माध्यमांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’ या प्रकरणाचा त्यात मोठा हात आहे. हे थांबले पाहिजे. सर्वात आधी बातमी देण्याची घाई विश्वासार्हतेला बाधा आणते. यावर उपाय म्हणजे घाई न करता संयत आणि खंबीर पत्रकारिता करणे. या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना भिडणारी पत्रकारिता करावी. सखोल अभ्यास करून व्यवस्थेला लोकाभिमुख धोरणात्मक बदल घडविण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पत्रकारितेची आवश्यकता आहे.Bbc
व्याख्यानाविषयी डॉ. आलोक यांनी सांगितले, त्यांचे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने विचारप्रवृत्त करणारे ठरले. एका अतिशय ॲकॅडेमिक भाषणाचा लाभार्थी होण्याचा हा योग होता. यावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली की, अभिजीत कांबळे यांनी पुढील काळात वेळोवेळी अशा पद्धतीने उदयोन्मुख पत्रकारांशी संवाद साधत राहायला हवे. Bbc
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा