Artist | ज्येष्ठ साहित्यिक कलाकारांसाठी सुवर्णसंधी; राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना; 1 जुलैपासून अर्ज सुरू - Rayat Samachar

Artist | ज्येष्ठ साहित्यिक कलाकारांसाठी सुवर्णसंधी; राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना; 1 जुलैपासून अर्ज सुरू

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ११.६ | रयत समाचार

(Artist) कला आणि साहित्य क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केले.

- Advertisement -

(Artist) या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले.

(Artist) योजनेसाठी अर्जदाराने कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षे कार्य केलेले असावे. तसेच वयाने ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे, अशी अटही शासनाने घातली आहे.

ज्यांची उपजीविका प्रामुख्याने कलेवर अवलंबून आहे आणि अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, अशा गरजू कलाकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र कलाकारांनी मुदतीत अर्ज करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading