शेवगाव|२५ डिसेंबर |लक्ष्मण मडके
Ahilyanagar News शेवगाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत देवटाकळी केंद्रातील काळेगाव शाळेच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता चौथीतील कु.शुभ्रा अनिल लांडे ने आपल्या यशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
“नाही होता आले सूर्य तरी हरकत नाही, पणती होण्याचे भाग्य मात्र मला डावलायचे नाही,” या प्रेरणादायी भावनेने बाल गटातील गोष्ट सादरीकरण(कथाकथन)स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.व जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“काय सांगू राणी मला गाव सुटना कशी सांगू राणी मला गाव सुटना” या कवितेसह माझा गाव या विषयावर उत्कृष्ठ वक्तृत्व सादरीकरण करत कु. मयूरी संभाजी कडूस हिने किलबिल गटात तृतीय क्रमांक मिळवून उपस्थितांचे मन जिंकून घेतले.
तसेच शाळेतील कु. प्रिया नामदेव पालवे बाल गट हस्ताक्षर स्पर्धा कु. दिव्या ज्ञानेश्वर लोखंडे बालगट वक्तृत्व स्पर्धा व कु. श्रद्धा श्रीराम सौदागर बालगट वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत शेवगाव पंचायत समिती तालुकास्तरावर उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. शुभ्रा अनिल लांडे हिला वर्गशिक्षक श्री. लक्ष्मण नागनाथ पिंगळे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. मुख्याध्यापक श्री. संदिप सुखदेव आहेर यांचे सहकार्य लाभले.
शुभ्राच्या यशाबद्दल शेवगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते , शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव, ग्रामविकास अधिकारी शेख मॅडम भायगाव सरपंच राजेंद्र आढाव तसेच गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काळेगाव शाळेच्या या विद्यार्थिनींनी आपल्या यशाने शाळेचा सन्मान वाढवला आहे, तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी साठी शुभेच्छा दिल्या.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर