Mumbai News: श्रीमती एम. पी. शाह महिला महाविद्यालयाचा वार्षिक सोहळा संपन्न; - Rayat Samachar
Ad image

mumbai news: श्रीमती एम. पी. शाह महिला महाविद्यालयाचा वार्षिक सोहळा संपन्न;

'सेव्ह द गर्ल चाइल्ड प्रोजेक्ट'च्या रीता अतुल संघवी यांचा सन्मान

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २० जानेवारी | गुरुदत्त वाकदेकर

(mumbai news) माटुंगा येथील सेवा मंडळ सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वार्षिक पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला. सोहळ्यास उद्धघाटक मुख्य अतिथी भारती पाठक, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय प्रमुख डॉ. विनोद झालटे, डॉ. भरत पाठक, अतुल संघवी, महाविद्यालय प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, उपप्राचार्य डॉ. अवनीश भट्ट, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. संगीता सिंह आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजल्वन करण्यात आले.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

(mumbai news) सेवा मंडळ सोसायटीचे सेक्रटरी डॉ. पाठक, प्राचार्य डॉ. पत्की यांनी मान्यवरांचे संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत केले तसेच शिक्षण, साहित्य आणि समाज या क्षेत्रासाठी सदैव तत्पर असणारे चंद्रवीर बंशीधर यादव आणि मनोज वाडिया यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ‘सेव्ह द गर्ल चाइल्ड प्रोजेक्ट’ अंतर्गत ३५० विद्यार्थिंनीना कपडे वाटप केल्याबद्दल रीता अतुल संघवी यांचाही सन्मान करण्यात आला.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
पूर्ण वर्षभर राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय असणाऱ्या ३४ स्वसंसेवक विद्यार्थिंनीना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. रेखा शेलार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सोहळ्याचे प्रमुख अतिथी भारती पाठक आणि डॉ. विनोद झालटे यांनी विद्यार्थिंनींचे कौतुक करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमणी नायडू आणि कोमल रामपूरे यांनी केले.mumbai news

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment